हरिपूर येथे वीटभट्टी कामगाराचा खून | पुढारी

हरिपूर येथे वीटभट्टी कामगाराचा खून

सांगली : पुढारी वृत्तसेवा

हरिपूर ( तालुका मिरज ) येथे पूर्ववैमनस्यातून विक्रम वाघमारे या वीटभट्टी कामगाराचा खून करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास घडली. सांगली ग्रामीण पोलीसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी सांगितले की, हरिपूर मधील मयत वीटभट्टी कामगार विक्रम वाघमारे आणि पिंगळे यांच्यात पूर्वीचा वाद होता. या वादातून न्यायालयीन खटलाही उभा राहिला आहे. हा खटला मागे घ्या म्हणून विक्रम वाघमारे शनिवारी दुपारी दारूच्या नशेत पिंपळे यांच्या घरासमोर जाऊन दंगा करत होता. त्यातून वाद होऊन वाघमारे यांचा खून करण्यात आला आहे.

वीटभट्टी कामगाराचा खून झाल्याची माहिती समजताच सांगली ग्रामीण पोलिसांचे पथक त्या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी काही संशयितांना ताब्यात घेतले आहे

Back to top button