आष्टा : घरकुले लाभार्थींच्या नावावर करा | पुढारी

आष्टा : घरकुले लाभार्थींच्या नावावर करा

आष्टा; पुढारी वृत्तसेवा : शासनाच्या घरकूल योजनेंतर्गत नगरपालिकेच्यामार्फत येथील मागासवर्गीयांना घरकुले देण्यात आली आहेत. ही घरकुले तातडीने लाभार्थींच्या नावावर करण्याच्या मागणीसाठी दलित महासंघाच्या वतीने आष्टा नगरपालिकेवर घोडा मोर्चा काढण्यात आला. मुख्याधिकारी मनोज देसाई यांना या मागणीचे निवेदन देण्यात आले.

दलित महासंघाचे राज्य संपर्क प्रमुख उत्तम मोहिते व जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण वारे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. मिसळवाडी येथून बाजारवाडी, चावडी मार्गे मोर्चा नगरपालिकेवर आला. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.

याबाबतचे निवेदन मुख्याधिकारी मनोज देसाई यांना देण्यात आले. देसाई यांनी पालिका कायदे सल्लागारांच्या सल्ल्यानुसार उचित कार्यवाहीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याचे लेखी आश्वासन दिले.

यावेळी जिल्हाध्यक्षा वनिता कांबळे, महेश देवकुळे, अनिल आवळे, अजित आवळे, महावीर चंदनशिवे, तेजत मोरे, मोहन वारे, सुहास वारे, राहुल मोरे , सचिन लोंढे, कार्यकर्ते उपस्थित होते.

Back to top button