सांगली : लग्न न केल्यास व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी | पुढारी

सांगली : लग्न न केल्यास व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

आटपाडी : पुढारी वृत्तसेवा :  आटपाडी तालुक्यातील एका गावातील २० वर्षाच्या युवतीला जवळच्या नातेवाईक असलेल्या अमर आप्पासो सूर्यवंशी आणि त्याच्या आई वडिलांनी लग्नास प्रवृत्त केले, तर अमरने धाक दाखवून वारंवार शारीरिक संबंध ठेवले. त्याचा व्हिडीओ तयार केला. तसेच मुलाच्या आई – वडिलांनी लग्न न केल्यास हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याबद्दल पीडितने आटपाडी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

फिर्यादीत म्हटले आहे की, अमर, त्याचे वडील आप्पासो आणि आई शालन (सर्व रा. खांजोडवाडी, ता. आटपाडी, जि. सांगली) या जवळच्या नातेवाईकांनी एक वर्षापूर्वी ते मे २०२२ दरम्यान लग्न करण्यास प्रवृत्त केले. दरम्यानच्या काळात अमरने रिव्हॉल्वरचा धाक दाखवून माझ्याशी मनाविरुध्द वारंवार शरीरसंबंध ठेवले. शरीरसंबंधाचा व्हिडीओ मोबाईलवर तयार केला. अश्लिल फोटो काढून ते माझ्या नातेवाइकांना पाठवून बदनामी करण्याची धमकी दिली. आप्पासो आणि शालन यांनी अमरशी लग्न कर अन्यथा, तुझे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली.

पीडितेच्या फिर्यादीनुसार अमर आप्पासो सूर्यवंशी, आप्पासो विठ्ठल सूर्यवंशी, शालन आप्पासो सूर्यवंशी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक वर्धन तपास करत आहेत. पोलिस या प्रकरणाच्या सर्व शक्यता तपासत आहेत. पोलिसांनी अजून कोणासही अटक केलेली नाही.

Back to top button