सांगली : यात्रेतील तमाशात दंगा करू नका असे म्हटल्याने दोघांना मारहाण | पुढारी

सांगली : यात्रेतील तमाशात दंगा करू नका असे म्हटल्याने दोघांना मारहाण

तासगाव; पुढारी वृत्तसेवा : लोकरेवाडी (ता. तासगाव) येथील यात्रेनिमित्त ठेवण्यात आलेल्या तमाशात दंगा करू नका, असे म्हटल्याने चिडून जाऊन दोघांना मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी 14 जणांविरोधात तासगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी जखमी योगेश विजय शिंदे (वय 23, रा. लोकरेवाडी) यांनी फिर्याद दाखल केली आहे. योगेश याच्याबरोबर यशवंत पवार हे ही जखमी झाले आहेत. मारहाणीत दगड व लोखंडी रॉडचा वापर करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल झालेल्यात अक्षय सुभाष बाबर, प्रदीप पंढरीनाथ बाबर, सर्जेराव विलास बाबर, सर्जेराव केरू बाबर, प्रवीण पंढरीनाथ बाबर, विजय धनाजी बाबर, तेजस बाबर, रणजित मोहन बाबर, सौरभ सर्जेराव बाबर, शुभम सर्जेराव बाबर, अरुण गणपत बाबर, विशाल गणपत बाबर, प्रथमेश आण्णासो बाबर, रोशन अशोक बाबर (सर्व रा. लोकरेवाडी) यांचा समावेश आहे.

याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी : लोकरेवाडी येथे तमाशा सुरू असताना संशयित सर्वजण दंगा करीत होते. त्यावेळी फिर्यादी योगेश व जखमी यशवंत हे त्या संशयितांना दंगा करू नका असे म्हणाले असता, चिडून जाऊन यातील संशयितांनी यशवंत पवार यांना मारहाण करून जखमी केले. तर संशयितांनी फिर्यादी योगेश याच्या घरात घुसून त्यांना लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केले तर त्याच्या घरावर दगडफेक करून नुकसान केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Back to top button