सांगली : लिंगनूरला म्हैसाळचे पाणी वितरण सुरू | पुढारी

सांगली : लिंगनूरला म्हैसाळचे पाणी वितरण सुरू

लिंगनूर; पुढारी वृत्तसेवा : लिंगनूर (ता. मिरज) येथील शाखा कालवे व उपकालवे यांतून म्हैसाळ योजनेच्या पाण्याचे वितरण सुरू झाले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान, लिंगनूर परिसरातून मागणी अर्ज देण्यासाठी व वसुलीपोटी रकमा जमा करण्यासाठी शेतकरीही पुढे होऊ लागली आहेत, अशी माहिती लिंगनूरचे सरपंच मारुती पाटील व म्हैसाळ योजनेचे लिंगनूर शाखा कालवा व डोंगरवाडी उपसा विभागाचे उपमुख्य कार्यकारी अभियंता कर्नाळे यांनी दिली.

सध्या लिंगनूरमध्ये कालव्यातून म्हैसाळच्या पाण्याचे आवर्तन सुरू आहे. कुडचे वस्ती, प्रार्थनाळे वस्ती येथील पाणीसाठ्यात पाणी सोडले आहे. शेजारी संतोषवाडी भागालाही पाणी सोडणे सुरू आहे. लिंगनूरमधून वसुलीही सुरू आहे. डोंगरवाडी उपसा सिंचन योजनेतून दोन दिवसांत पाणी सुरू होईल. मागणी अर्ज भरून दिले तरी सर्वांना पाणी दिले जाईल. आधी मागणी अर्ज तरी शेतकर्‍यांनी दिले पाहिजेत, असेही मत खात्याच्या अधिकार्‍यांनी व्यक्त केले.

Back to top button