सांगली : प्राणीक्लेष प्रतिबंधक कायद्याची जागृती करा; जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांचे आवाहन | पुढारी

सांगली : प्राणीक्लेष प्रतिबंधक कायद्याची जागृती करा; जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांचे आवाहन

सांगली; पुढारी वृत्तसेवा : कोणत्याही प्राण्यांचे पालकत्व धारण करणार्‍या व्यक्तींकडून त्या प्राण्यास कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये, यासाठी प्राणीक्लेष प्रतिबंधक कायद्याची प्रभावी जनजागृती करा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी जिल्हा प्राणी प्रतिबंधक सोसायटीच्या सभेत दिल्या.

जिल्हा प्राणीक्लेष प्रतिबंधक सोसायटीची सभा डॉ. दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. डी. एच. पठाण, जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे, महापालिकेचे डॉ. आर. के. ताटे, आर. टी.ओ., पोलिस व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पेट शॉप व डॉग ब्रीडिंग प्राणी कल्याण मंडळाकडे नोंदणी आहे की नाही याची तपासणी करावी. जे पेट शॉप व डॉग ब्रिडर्स नोंदणी करणार नाहीत त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करावी, अशा सूचना जिल्हाधिकार्‍यांनी बैठकीत दिल्या.

प्राणीक्लेष कायद्याअंतर्गत प्राप्त तक्रारीची तातडीने शहानिशा करून दोषी आढळणार्‍यांवर कारवाई करणे, बैलगाडी, घोडागाडी शर्यती संदर्भात प्राणीक्लेष प्रतिबंधक कायद्यांतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्याचा आढावा आणि महापालिका क्षेत्रात भटक्या व मोकाट कुत्र्याचे निर्बिजीकरण करणे याबाबतचा आढावा बैठकीत घेण्यात आला.

Back to top button