

आटपाडी ः राजेवाडी (ता. आटपाडी) येथील सद्गुरू साखर कारखान्यास वाहन, घंटागाडी, मजूर व टोळी देण्यासाठी नोटरी करून 47 लाख रुपये घेतले, पण वाहन, घंटागाडी, टोळी न देता फसवणूक केली आहे. याबाबत प्रवीण शिवाजी फुले (वय 32) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार बीड जिल्ह्यातील 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साखर कारखान्याकडून 22 ऑगस्ट 2024 ते 5 नोव्हेंबर 2024 दरम्यान उचल घेतली. त्यानंतर संगनमत करून त्यांनी श्री श्री सद्गुरू साखर कारखान्यास कोणतेही वाहन किंवा मजूर पुरवले नाहीत आणि रक्कमही परत केली नाही. त्यामुळे प्रवीण शिवाजी फुले यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, राजाभाऊ दत्तात्रय मुंडे (रा. पहाडी पारगाव, ता. धारूर), नितीन अश्रुबा नागरगोजे (रा. देवगाव, ता. केज), महादेव चंद्रसेन मुंडे (रा. कोठारबन, ता. वडवणी), ज्ञानोबा अंकुश धाईतिडक (रा. कोठारबन, ता. वडवणी), रमेश पांडुरंग मुंडे (रा. कोठारबन, ता. वडवणी), अंकुश भीमा अडगळे, (रा. सोनीमोहा, ता. धारूर), श्रीराम एकनाथ मुंडे (रा. चारदरी, ता. धारूर), जालिंदर एकनाथ मुंडे (रा. चारदरी, ता. धारूर), बाळासाहेब राजेसाहेब मुंडे (रा. चारदरी, ता. धारूर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.