सांगली : यात्रांचा हंगाम अन् बैलगाडी शर्यतीची सुगी | पुढारी

सांगली : यात्रांचा हंगाम अन् बैलगाडी शर्यतीची सुगी

सांगली; पुढारी वृत्तसेवा : बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठविल्याने आता गावोगावच्या यात्रा आणि उरुसात होणार्‍या शर्यतीच्या आयोजनाची तयारी सुरू झाली आहे. शर्यतीसाठी लागणार्‍या गाड्या तयार करण्यासाठी प्रसिद्ध असणार्‍या नांद्रे येथे कारागिरांची लगबग सुरू झाली आहे.

ग्रामीण भागात यात्रा काळात हमखास बैलगाडी, घोडागाडी शर्यत भरवली जाते. बैलगाडी शर्यतीवरील बंदी आणि त्यानंतर कोरोनामुळे शर्यती झाल्या नाहीत. नियमांचे पालन करून शर्यतीस परवानगी मिळाली असल्याने आता शर्यतप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. जातीवंत खिलार बैल आणि खास शर्यतीसाठी असणार्‍या वजनाने हलक्या गाड्या याला पुन्हा एकदा चांगले दिवस आले आहेत. मिरज तालुक्यातील नांद्रे येथे शर्यतीसाठी लागणार्‍या गाड्या तयार केल्या जातात. वजनाने कमी, मजबूत गाड्यांना मागणीही चांगली आहे.

Back to top button