विट्यात आज होणाऱ्या आरोग्य महाशिबिराच्या तयारीची आमदार बाबर यांच्याकडून पाहणी | पुढारी

विट्यात आज होणाऱ्या आरोग्य महाशिबिराच्या तयारीची आमदार बाबर यांच्याकडून पाहणी

विटा, पुढारी वृत्तसेवा : विट्यात उद्या शनिवारी मोफत आरोग्य महा शिबिराची तयारी पूर्ण झाली आहे. आमदार अनिलराव बाबर यांनी शिबिर स्थळाची पाहणी करून समाधान व्यक्त केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानि मित्त विट्यात आज एक दिवसीय आरोग्य महा शिबिर होत आहे. बाळासाहेबांची शिवसेना वैद्य कीय मदत कक्ष, डॉ. श्रीकांत शिंदे फौंडेशन आणि विट्याचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर होत आहे.मंत्री शंभुराजे देसाई यांच्यासह अनेक राजकीय मंडळी या शिबिराला भेट देणार आहेत. हजारो रुग्णांची नोंदणी झाली आहे.

रुग्णांना ने -आण करण्यासाठी गावोगावी गाड्या, रुग्णवाहिकांचे नियोजन करण्यात आले आहे. विटा शहर व उपनगरातही वाहनांची सोय करण्यात आली आहे. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता एस टी गाड्यांची सोय करण्यात आली आहे.शिबिरासाठी सर्व घटकांचा समन्वय राहण्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांच्या उपस्थितीत सर्व वैद्यकीय अधिकारी व फार्मसिस्ट, आरोग्य सेवक, कर्मचारी यांची बैठक पार पडली. माजी नगसेवक अमोल बाबर यांच्या मार्गदरशनाखाली उद्या होणाऱ्या शिबिराची रंगीत तालीम करण्यात आली. यावेळी स्वयंसेवकांना सुचना देण्यात आल्या. आमदार बाबर यांनी शिबिर स्थळाची पाहणी केली. आजरानुसार बनविण्यात आलेले कक्ष, रुग्णांची बैठक व्यवस्था, अल्पोपहार, नोंदणी, आधुनिक मशनिरी, मंडप व्यवस्था, पार्किंग व्यवस्था, अशा विविध विषयांवर प्रशासन, पोलीस यंत्रणा आदींची बैठक घेऊन सूचना देण्यात आल्या. रुग्णांना कसलीही अडचण आल्यास संपर्क साधण्यासाठी एक मध्यवर्ती मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

संपर्क साधण्यासाठी सात ठिकाणी वॉकी ठेवण्यात आले आहेत. सुमारे दीडशेहून अधिक आरोग्य अधिकारी, तज्ञ डॉक्टर, परिचारिका, आरोग्य सेवक, आशा सेविका व ५०० स्वयंसेवक या ठिकाणी कार्यरत राहणार आहेत. तपासणीनं तर रुग्णांसाठी शिबिर स्थळीच सुसज्ज औषधालय ही उभारण्यात आले आहे. आज शुक्रवारी दुपारी आमदार बाबर यांनी या तयारी ची पाहणी करून समाधान व्यक्त केले. प्रत्यक्ष शिबिराच्या दिवशी रुग्णांना औषधे देण्यासाठी तब्बल ५० फार्मसिस्ट सेवा देणार आहेत. सर्व आजारांवर मोफत औषधे एकाच ठिकाणी मिळतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button