Koyana Express : मेगा ब्लॉकमुळे 9 तारखेची कोयना एक्सप्रेस रद्द | पुढारी

Koyana Express : मेगा ब्लॉकमुळे 9 तारखेची कोयना एक्सप्रेस रद्द

मिरज; पुढारी वृत्तसेवा : मिरज- पुणे रेल्वे मार्गावर पळशी ते जरंडेश्वर दरम्यान दुहेरीकरणाच्या कामासाठी दि. 9 रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे कोल्हापूर- मुंबई- कोल्हापूर कोयना एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. (Koyana Express)

मिरज- पुणे रेल्वे मार्गावर दुहेरीकरणाचे काम करण्यात येत आहे. यासाठी यापूर्वीच कोल्हापूर -पुणे- कोल्हापूर एक्सप्रेस आणि कोल्हापूर -सातारा -कोल्हापूर डेमू रद्द करण्यात आली आहे. आता पळशी ते जरंडेश्वर स्थानकादरम्यान दुहेरीकरणाचे काम दि. 9 रोजी करण्यात येणार आहे. या कामासाठी कोल्हापूर- मुंबई -कोल्हापूर कोयना एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. दि. 8 रोजी येणारी गोंदिया- कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस पुणे स्थानकात थांबविण्यात येणार आहे. दि. 9 रोजी ही गाडी पुण्यातूनच गोंदियाला परत जाईल. पुणे ते कोल्हापूर दरम्यान महाराष्ट्र एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. तर त्याच दिवशी धावणारी निजामुद्दीन- वास्को गोवा एक्सप्रेस दौंड, कुर्डूवाडी, मिरजमार्गे वळविण्यात आली आहे. (Koyana Express)

Back to top button