सांगली : बुधगावमध्ये अवैध वाळूने भरलेला डम्पर जप्त | पुढारी

सांगली : बुधगावमध्ये अवैध वाळूने भरलेला डम्पर जप्त

सांगली : पुढारी वृत्तसेवा : बेकायदा वाळूची वाहतूक करणारा डम्पर सांगली ग्रामीण पोलिसांनी जप्त केला. बुधगाव (ता. मिरज) येथील वसंतदादा पाटील इंजिनिअरींग कॉलेजसमोर ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नितीन विलास गायकवाड (रा. शेटफळे, ता. आटपाडी) व तेजस तुकाराम मोरे (रा. लांडगेवाडी, ता. कवठेमहांकाळ) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. वाळू ही शासनाची मालमत्ता आहे, हे माहित असूनही त्यांनी सांगोला (जि. सोलापूर) येथून नदी पात्रातून उपसा केली. ती डम्परमधून (एमएच ६८४५) सांगलीकडे वाहतूक करीत होती. याची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी सांगली -डम्पर जप्त कवलापूर मार्गावर सापळा लावला होता. बुधगाव ये वसंतदादा पाटील इंजिनिअरींग‍ कॉलेजसमोर हा डम्पर पकडला.

तेजस मोरे हा डम्पर चालवित होता. डम्परमध्ये सात ब्रास वाळू होती ही वाळू व डम्पर असा एकूण पाच लाख ४२ हजार रुपये किंमतीच मुद्देमाल जप्त केला आहे. गौण खनिज कायद्यांतर्गत गुन्ह दाखल केला आहे.

Back to top button