सांगली : पोलिसांना टीप दिल्याच्या संशयातून एकास मारहाण; गुन्हा दाखल | पुढारी

सांगली : पोलिसांना टीप दिल्याच्या संशयातून एकास मारहाण; गुन्हा दाखल

सांगली : पुढारी वृत्तसेवा : पोलिसांना ‘टीप’ दिल्याच्या संशयावरून रवी सिद्राम पवार (वय ३१, रा. अच्युतराव कुलकर्णी प्लॉट, रेल्वे स्टेशनसमोर, सांगली) या तरुणास काठीने बेदम मारहाण करण्यात आली. गुरुवारी रात्री ही घटना घडली.

याप्रकरणी रमजान सलीम मोमीन (वय ३३, रा. वडर कॉलनी, सांगली) याच्याविरूद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवी पवार हा रेल्वे स्टेशनजवळ बारूदवाले यांच्या चहाच्या टपरीवर उभा होता. त्यावेळी संशयित मोमीन तिथे आला. त्याने पवारला ‘तृ पोलिसांना माझी टीप का देतोस’, अशी विचारणा केली. यातून दोघांत जोरदार वाद झाला. त्याचे पर्यवसन मारामारीत झाले.

मोमीन याने पवारला काठीने बेदम मारहाण केली. पवारची बहीण मारामारी सोडविण्यास पुढे गेली. त्यावेळी मोमीनने तिला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच बहिणी जिवे मारण्याची धमकी देऊन त्याने पलायन केले. रात्री उशिरा पवारने फिर्याद दाखल केली. मोमीनचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Back to top button