सांगली : लिंगनूर तलावात पन्नास टक्के पाणीसाठा शिल्लक | पुढारी

सांगली : लिंगनूर तलावात पन्नास टक्के पाणीसाठा शिल्लक

लिंगनूर; पुढारी वृत्तसेवा : लिंगनूर (ता. मिरज) येथे तालुक्यातील दुसर्‍या क्रमांकाच्या असणार्‍या तलावात सध्या पन्नास टक्क्यांच्या आसपास पाणीसाठा शिल्लक आहे. अजूनही तलावातील पाणीसाठा शिल्लक असल्याने भागातील शेतीला मोठा आधार आहे.

आता पाणीसाठा कमी होत चालला असून म्हैसाळ योजना सुरू झाल्यावर या तलावात पाणी सोडले की, हिवाळ्यात आणि पूर्ण उन्हाळ्यातसुद्धा या तलावातील पाणी वापरता येऊ शकते. परंतु, अद्याप योजना सुरू झाली नाही. तरीही अजून काहीसा पाणीसाठा शिल्लक असल्याने अल्पावधीत पाणी टंचाईच्या झळा सुरू होणार आहेत.

खटाव, संतोषवाडी, जानराववाडी आणि लिंगनूर भागाला या तलावातील पाण्याचा लाभ घेणारे लाभार्थी शेतकरी आहेत. द्राक्षबागांच्या खरड छाटण्या झाल्या की पुन्हा पाण्याची टंचाई सुरू होते. भागातील ऊसपीकला पाणी कमी पडते हा नेहमीचा अनुभव आहे. त्यामुळे आता पाणीसाठा 33 टक्क्यांच्या खाली येण्यापूर्वी म्हैसाळ योजना सुरू होऊन पाणी भरून घेता येईल, या आशेत भागातील शेतकरी आहे.

Back to top button