सांगली : चांदोलीचे पर्यटन तीन दिवस राहणार बंद | पुढारी

सांगली : चांदोलीचे पर्यटन तीन दिवस राहणार बंद

वारणावती; पुढारी वृत्तसेवा : चांदोली परिसरातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्प तसेच चांदोली धरण दि. 30, 31 डिसेंबर ते 1 जानेवारी असे तीन दिवस पर्यटकांसाठी बंद राहणार आहे, अशी माहिती चांदोलीचे वनक्षेत्रपाल नंदकुमार नलवडे व वारणा प्रकल्पाचे उपविभागीय अभियंता मिलिंद किटवाडकर यांनी दिली.

सरत्या वर्षाला निरोप देताना तसेच नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक पर्यटक चांदोली परिसरात येतात. त्यामध्ये काही अतिउत्साही पर्यटक दंगा, गोंगाट, जल्लोषामुळे चांदोली राष्ट्रीय उद्यानामधील वन्यजीव तसेच वन्यजीवांची आश्रयस्थळे यांना धोका पोहोचण्याची शक्यता असते. उद्यानातील वन्यजीवांचा धोका टाळण्यासाठी तसेच धरण परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ही बंदी घालण्यात आली आहे. सोमवार (दि. 2) पासून धरण व अभयारण्य पुन्हा पर्यटकांसाठी खुले करण्यात येणार आहे.

Back to top button