सांगली : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी २० कुस्तीगिरांची निवड | पुढारी

सांगली : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी २० कुस्तीगिरांची निवड

विटा : पुढारी वृत्तसेवा : राज्यात होणाऱ्या महाराष्ट्र केसरी किताबासाठी खुल्या गटातून गादी प्रकारातून सुबोध पाटील तर माती प्रकारात संदीप मोटे यांची निवड झाली. खानापूर (जि. सांगली) येथे नुकतीच निवड चाचणी स्पर्धा झाली. राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन पुणे आणि अहमदनगर येथे  केले जाणार आहे.

खानापूर (जि. सांगली) येथे जिल्हा तालीम संघ आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वती ने २४ आणि २५ डिसेंबर रोजी सांगली जिल्हा स्तरीय निवड कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या निवड चाचणीत जिल्ह्यातील एक हजारांहून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यात माती आणि मॅट या दोन्ही गटातील खेळाडू सहभागी झाले होते. यात महाराष्ट्र केसरीसाठी गादी प्रकारात सुबोध पाटील तर माती प्रकारात संदीप मोटे हे सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील.

महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी निवड झालेले खेळाडू पुढील प्रमाणे –

या निवड चाचणी स्पर्धेत विजयी होऊन महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी निवड झालेले खेळाडू पुढील प्रमाणे : खुला गट माती प्रकार संदीप मोटे, माती विभाग ९७ किलो – अभिषेक घार्गे, ९२ किलो- सयाजी जाधव, ८६ किलो- सचिन माने, ७९ किलो – अंकुश माने, ७४ किलो – श्रीकांत निकम, ७० किलो- मयूर जाधव, ६५ किलो- अतुल चौगुले, ६१ किलो- तेजस पाटील, ५७ किलो- रोहित तामखडे यांची निवड झाली.

गादी प्रकारात निवड झालेले खेळाडू –

तसेच गादी प्रकारात सुबोध पाटील खुला गटासाठी ९७ – किलो सागर तामखडे, ९२ किलो- विश्वजीत रुपनर, ८६ किलो – भारत पवार, ७९ किलो – प्रथमेश गुरव, ७४ किलो – अतुल नायकल, ७० किलो – नाथा पवार, ६५ किलो- सुनील बंडगर, ६१ किलो- प्रकाश कोळेकर, ५७ किलो- निनाद बडरे यांची महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी सांगली जिल्ह्यातून निवड निश्चित झाली.

ही निवड चाचणी स्पर्धा जिल्हाध्यक्ष नामदेवराव मोहिते, उपाध्यक्ष राजेंद्र शिंदे, सचिव प्रताप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. माजी जिल्हा परिषद सदस्य सुहास शिंदे, महेश जाधव, सज्जन बाबर यांनी या स्पर्धेचे संयोजन केले. ही निवड चाचणी यशस्वी करण्यासाठी सांगली जिल्हा पंच कमिटीने मोलाचे योगदान दिले. यावेळी आंतरराष्ट्रीय कुस्तीचे कोच उत्तमराव पाटील, परशुराम गायकवाड, कृष्णदेव शिंदे, अशोक शिंदे, अमित शिंदे, संदीप गायकवाड, ओंकार पाटील, राजन पवार, अतुल जाधव, विठ्ठलसिंग रजपूत आदीसह कुस्ती प्रेंमी उपस्थित होते.

हेही वाचलंत का ? 

Back to top button