मिरजेत मोबाईल चोरट्याला अटक; तीन मोबाईल हस्तगत | पुढारी

मिरजेत मोबाईल चोरट्याला अटक; तीन मोबाईल हस्तगत

मिरज : पुढारी वृत्तसेवा ;  शहरात विविध ठिकाणी मोबाईल चोरून ते विक्रीच्या प्रयत्नात असणाऱ्या एकाला अटक करून त्याच्याकडून पोलिसांनी चोरीचे मोबाईल जप्त केले. विठ्ठल शिंगाडी मेटागुड (वय ३१, रा. लक्ष्मीनगर, बेलकुड, ता. चिक्कोडी, जि. बेळगाव) असे त्याचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मिरज शहरात गेल्या काही दिवसात मोबाईल चोरीच्या घटनात वाढ झाली होती. त्याचा तपास करण्याचे आदेश पोलिस अधीक्षकांनी दिले होते. त्यानुसार महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रवीराज फडणीस आणि गुन्हे प्रकटीकरणचे उपनिरीक्षक रजू अन्नछत्रे तपास करीत होते. यावेळी शहरातील अमर टॉकीजवळ एकजण चोरीचे मोबाईल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती उपनिरीक्षक अन्नछत्रे यांना मेटागुड याने ते मोबाईल प्रताप मिळाली, त्यानुसार पथकाने सापळा लावला होता.

मिळालेल्या माहितीची खात्री पटवून मेटागुड याच्यावर छापा टाकण्यात आला. यावेळी त्याच्याकडून ४५ हजार रुपये किंमतीचे तीम मोबाईललपोलिसांनी हस्तगत केले. मेटागुड याने ते मोबाईल  प्रताप कॉलनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान आणि मुरज ग्रामीण बस स्थानकातून चोरले असल्याची कबूली दिली आहे. याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली असून महात्मा गांधी चौक पोलिस टाण्यात मोंद करण्यात अली आहे.

 

Back to top button