सांगलीत कोयता जप्त : दहशत माजविण्याच्या प्रयत्नात असलेल्या एकास अटक | पुढारी

सांगलीत कोयता जप्त : दहशत माजविण्याच्या प्रयत्नात असलेल्या एकास अटक

सांगली : पुढारी वृत्तसेवा : येथील कनुभाई देसाई मिलकडे जाणार्‍या मार्गावर कोयता बाळगून दहशत माजविण्याचा प्रयत्न करणार्‍या महम्मद साद डावल समलेवाले (वय 21, वडर कॉलनी, सांगली) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या ताब्यातून कोयता जप्त केला आहे.

समलेवाले हा कंबरेला कोयता लावून फिरत आहे. तो कनुभाई देसाई मिल मार्गावर दहशत माजविण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती विश्रामबाग पोलिसांना मिळाली. त्यानंतर त्याला पकडले. त्याच्या ताब्यातून कोयता जप्त केला. त्याची किंमत दोनशे रुपये आहे. त्याच्याविरूद्ध बेकायदा हत्यार बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस अंमलदार संदीप घस्ते यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्याच्यावर यापूर्वी काही गुन्हे दाखल आहेत, याबद्दल माहिती घेतली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Back to top button