इस्लामपूर, कासेगावात गुटखा, सुगंधी पान मसाला जप्त अन्न, औषध प्रशासनाची कारवाई | पुढारी

इस्लामपूर, कासेगावात गुटखा, सुगंधी पान मसाला जप्त अन्न, औषध प्रशासनाची कारवाई

सांगली : पुढारी वृत्तसेवा : इस्लामपूर येथे तीन ठिकाणी तर कासेगाव येथे एका ठिकाणी अन्न, औषध प्रशासनाने छापा टाकून सुमारे एक लाख रुपयांचा बेकायदा विक्री होत असलेला गुटखा, पानमसाला, सुगंधित सुपारी व तंबाखू जप्त केला. इस्लामपूर येथे मातोश्री पान शॉपवर छापा टाकून विक्रेता कुशल वसंतराव खंडागळे व त्याच्या मालकावर कारवाई करून 70 हजार 475 रुपयांचा 296 किलो पानमसाला व सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला.

इस्लामपूर येथे आजाद पान शॉप दुकानावर छापा टाकून अल्फाज निसार तांबोळी या विक्रेता व मालकावर कारवाई करून पानमसाला व सुगंधित तंबाखूचा 6 हजार 15 रुपयाचा साठा जप्त केला. रॉयल पान शॉप या दुकानावर छापा टाकून फैजुलहक हारून दिवाण या विक्रेत्याच्या ताब्यातून 1 हजार 647 रुपयांचा पानमसाला व सुगंधित तंबाखू जप्त केली. कासेगाव येथे ए जी पान शॉपमधून विजय तुकाराम चव्हाण आणि भागीदार यांच्याकडून 16 हजार रुपयांचा पानमसाला व सुगंधित तंबाखू जप्त केली. चारीही दुकाने सील केली आहेत.

Back to top button