सांगली येथील गणपती मंदिरात ‘चोर गणपती’ प्रतिष्ठापना संपन्न | पुढारी

सांगली येथील गणपती मंदिरात 'चोर गणपती' प्रतिष्ठापना संपन्न

सांगली : पुढारी वृत्तसेवा

सांगलीचे आराध्य दैवत आणि सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान असणाऱ्या गणपती मंदिर येथे चोर गणपती बसवण्याची परंपरा आहे. गणेश चतुर्थीच्या चार दिवस अगोदर या गणेशाची प्रतिष्ठापना केली जाते.

गणेश चतुर्थीला सर्वत्र मोठ्या थाटात गणेशाचे आगमन होते. मात्र त्या अगोदर कोणालाही माहिती न होता या गणेशाची प्रतिष्ठापना होते. या प्रथेला चोर गणपती म्हणतात. सांगलीत शंभर वर्षापूर्वीपासून ही परंपरा सुरु आहे. ही गणपतीची मूर्ती कागदी लगदयापासून बनवली आहे.

या मूर्तीचे विसर्जन केले जात नाही जतन केले जाते. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मंदिरे बंद आहेत. उत्सवावर निर्बंध आहेत त्यामुळे गर्दी होईल, असे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले असून साध्या पद्धतीने धार्मिक विधी पार पाडण्यात येत आहेत, अशी माहिती मंदिरातील पुजारी रमेश पाटणकर यांनी दिली आहे.

हेही वाचलं का ? 

 

Back to top button