सांगलीसह सात बाजार समित्यांचा आजपासून निवडणूक कार्यक्रम | पुढारी

सांगलीसह सात बाजार समित्यांचा आजपासून निवडणूक कार्यक्रम

सांगली ः पुढारी वृत्तसेवा : राज्यात मुदत संपणार्‍या सर्व बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम सहकार प्राधिकरणकडून जाहीर झाला आहे. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीसह जिल्ह्यातील तासगाव, पलूस, विटा, इस्लामपूर, शिराळा आणि आटपाडी या सात बाजार समित्यांची निवडणूक 29 जानेवारीला होणार आहे. मात्र, दि. 27 सप्टेंबरपासून मतदार यादी कार्यक्रम सुरू होणार आहे.

राज्यात 31 डिसेंबर 2022 अखेर मुदत संपणार्‍या सर्व बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने पंधरा दिवसांपूर्वी जाहीर केला आहे. जिल्ह्यातील सात बाजार समित्यांवर सध्या प्रशासक आहे. दि. 27 सप्टेंबरपासून मतदारयादीचा कार्यक्रम राबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अंतिम मतदार यादी 7 नोव्हेंबरला प्रसिद्ध होईल. दि. 29 जानेवारी 2023 रोजी मतदान होणार आहे. प्रचलित पद्धतीने मतदार कायम ठेवण्यात आले आहेत. सातही बाजार समित्यांमध्ये यावेळी जोरदार लढत होण्याची शक्यता आहे. त्याद़ृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

Back to top button