

कडेगाव : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सहकार्याने पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघातील 3322 घरकुलांना मंजुरी मिळाली असून, कडेगाव तालुक्यातील 2044, तर पलूस तालुक्यातील 1278 जणांचे घराचे स्वप्न साकार होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य, कष्टकरी, उपेक्षित, बेघर व्यक्तींना स्वतःचे हक्काचे घर मिळावे यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 10 लाख घरांना मंजुरी दिली असून पहिल्या हप्त्याचे 15000 रुपयेप्रमाणे 1500 कोटींचे वाटप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत बालेवाडी पुणे येथून होणार आहे. प्रत्येक ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्ह्याच्या ठिकाणी घरकूल मंजुरी पत्र व हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे.
देशमुख म्हणाले, कडेगाव तालुक्यातील अमरापूर 52, अंबक 50, आंबेगाव 39, अपशिंगे 43, आसद 54, बेलवडे 54, भिकवडी खुर्द 11, बोंबाळेवाडी 33, चिखली 22, चिंचणी 67, देवराष्ट्रे 70, ढाणेवाडी 15, हणमंतवडीये 29, हिंगणगाव बुद्रुक 5, हिंगणगाव खुर्द 44, कडेपूर 38, कान्हरवाडी 25, करांडेवाडी 22, खंबाळे औंध 34, खेराडे वांगी 59, खेराडे विटा 53, कोतवडे 37, कोतीज 22, कुंभारगाव 77, मोहिते वडगाव 52, नेर्ली 55, नेवरी 29, निमसोड 23, पाडळी 42, रायगाव 22, रामापूर 21, रेणुशेवाडी 11, सासपडे 41, शाळगाव 74, शेळकबाव 29, शिरसगाव 44, शिरगाव 33, शिवाजीनगर 54, शिवणी 54, सोहोली 53, सोनकिरे 54, सोनसळ 18, तडसर 65, तोंडोली 8, तुपेवाडी ये. 10, उपाळे वांगी 43, उपाळे मायणी 52, वडियेरायबाग 41, वाजेगाव 5, विहापूर 40, वांगी 75, येडे 17, येतगाव 39, येवलेवाडी 15, अशा 2 हजार 44 घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. ते म्हणाले, घरकुल अनुदानाची रक्कम ही लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार असून, घरकूल लाभार्थ्यांनी शासन नियमाप्रमाणे व वेळेत आपले घरकूल पूर्ण करून घेण्याचे आवाहन देशमुख यांनी शेवटी केले.