सांगली : विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसाविरुद्ध गुन्हा | पुढारी

सांगली : विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसाविरुद्ध गुन्हा

सांगली : पुढारी वृत्तसेवा महिला पोलिसाचा विनयभंग केल्याप्रकरणी भिलवडी (ता. पलूस) येथील पोलिस शिवाजी कोकाटे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. 13 ऑगस्ट रोजी ही घटना घडली. मात्र, भिलवडी पोलिस याची माहिती देण्यास अजूनही टाळाटाळ करीत आहेत. पीडित महिला पोलिसाने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, कोकाटे याने ड्युटीवर असताना अश्‍लील वर्तन केले. पीडितेने वरिष्ठ अधिकार्‍यांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानंतर दि. 17 ऑगस्ट रोजी कोकोटे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पीडित महिला पोलिस ठाण्यातील अंमलदार कक्षासमोर थांबली होती. त्यावेळी कोकाटे यांनी तिच्याशी अश्‍लील वर्तन केले. यावेळी महिलेने त्याच्याशी वादही घातला. गुन्हा दाखल होऊनही तेथील ठाणेप्रमुख व कर्मचार्‍यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देण्याचे जाणीवपूर्वक टाळले. दरम्यान, यासंदर्भात जिल्हा पोलिसप्रमुख दीक्षित गेडाम यांना अहवाल सादर करण्यात आला आहे. कोकाटे यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.

Back to top button