उत्पन्नाचे वेगळे स्त्रोत निर्माण करा | पुढारी

उत्पन्नाचे वेगळे स्त्रोत निर्माण करा

आष्टा : पुढारी वृत्तसेवा आता गावोगावच्या सेवा सोसायट्यांनी नव-नवीन उद्योग-व्यवसाय सुरू करून आपल्या संस्थेचे उत्पन्नाचे स्रोत निर्माण करायला हवेत. यातूनच गावाच्या विकासाचा कणा असलेल्या या संस्था अधिक मजबूत होतील, असा विश्वास माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केला. वाळवा तालुक्यातील गोटखिंडी येथील गोटखिंडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांच्याहस्ते नूतन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. आ. पाटील म्हणाले, ग्रामीण भागाच्या विकासात सेवा सोसायट्यांचे योगदान मोठे आहे.

आपल्या संस्थेने 106 वर्षे पूर्ण करीत गावातील शेतकर्‍यांना आर्थिक ताकद दिली आहे. भविष्यातही आपल्या संस्थेच्या प्रगतीचा आलेख चढताच राहील. यावेळी राजारामबापू बँकेचे अध्यक्ष शामराव पाटील, जिल्हा बँकेचे संचालक वैभव शिंदे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, संजय पाटील, सुस्मिता जाधव, सागर डवंग, शांताबाई वालेकर, राजारामबापू दूध संघाचे संचालक धैर्यशील थोरात, प्रकाश एटम, सरपंच विजय लोंढे, माजी जि. प. सदस्या राजश्री एटम, पं. स. सदस्य आनंदराव पाटील आदी उपस्थित होते.

Back to top button