सांगली : प्रतापपूर येथे शेतकर्‍याची गळफासाने आत्महत्या | पुढारी

सांगली : प्रतापपूर येथे शेतकर्‍याची गळफासाने आत्महत्या

जत; पुढारी वृत्तसेवा : प्रतापपूर (ता. जत) येथील बाळू नामदेव खांडेकर (वय 45) या शेतकर्‍याने गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. मयत खांडेकर यांची प्रतापपूर गावापासून 3 कि.मी अंतरावर शेती आहे. खांडेकर यांची पत्नी व मुलगी सांगली येथील एका दवाखान्यात गेल्या होत्या. बुधवारी रात्री मुलगा व मयत खांडेकर असे दोघेजण घरात होते. मध्यरात्रीनंतर मुलगा झोपल्याचे पाहून खांडेकर यांनी घराजवळ असलेल्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत जत पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Back to top button