सांगली : जत पोलिस ठाण्यातील दोघे लाचखोर निलंबित | पुढारी

सांगली : जत पोलिस ठाण्यातील दोघे लाचखोर निलंबित

सांगली; पुढारी वृत्तसेवा : अपघाताच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी 25 हजार रुपये लाचेची मागणी करून ती घेणार्‍या जत पोलिस ठाण्यातील दोन्ही पोलिसांना बुधवारी निलंबित करण्यात आले. जिल्हा पोलिसप्रमुख दीक्षित गेडाम यांनी ही कारवाई केली. दोघांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेशही गेडाम यांनी दिले आहेत.

पोलिस नाईक संभाजी मारूती कारंडे (वय 38, रा. कोश्यारी, ता. जत) गणेश ईश्‍वरा बागडी (वय 37, रा. मिरज) अशी निलंबित पोलिसांची नावे आहेत. गेल्या आठवड्यात हे प्रकरण घडले होते. बागडीने लाचेची मागणी केली. पण प्रत्यक्षात त्याने घेतली नाही.लाचेची रक्कम त्याने संभाजी कारंडे याला घेण्यास सांगितले. कारंडे लाच घेताना रंगेहाथ सापडला होता. छाप्याची चाहूल लागताच बागडी पसार झाला होता.

Back to top button