सांगली : डॉल्बीमुळे नेवरी येथे एकाला हृदयविकाराचा झटका

नेवरी; पुढारी वृत्तसेवा ; नेवरी येथे डॉल्बीच्या आवाजाने वृद्धाला हृदयविकाराचा झटका आला. विटा येथे खासगी दवाखान्यात वेळेत उपचार केल्यामुळे अनर्थ टळला. दरम्यान, यामुळे डॉल्बीच्या वाद्याच्या आवाजावर नियंत्रण गरजेचे बनले असल्याचे अधोरेखित झाले आहे.
आता तर डॉल्बी वाद्याचे भाडे वीस हजारांपासून लाखाच्या घरात आहे. अनेक वेळा सर्वसामान्यांच्या समारंभामध्ये डॉल्बीचा वापर फारसा केला जात नाही. मात्र, पैसेवाले सर्रास डॉल्बीचा वापर करत आहे. यामुळे याबाबत तक्रार करण्यास मर्यादा येत आहेत. याचाच फायदा घेऊन डॉल्बीचे प्रस्थ वाढत आहे. डॉल्बीच्या आवाजाबाबतच्या मर्यादा ओलांडल्या जात आहेत.