शिक्षक बँकेत सभासदांचा विश्‍वास सार्थ ठरवू | पुढारी

शिक्षक बँकेत सभासदांचा विश्‍वास सार्थ ठरवू

सांगली ः प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकी आधी 12 संघटना एकत्र आल्या. त्यांनी आपणावर विश्वास ठेवला. त्याच दिवशी आमचा विजय निश्चित झाला होता. आता बँकेच्या कारभारात सभासद, कार्यकर्ते यांनी ठेवलेला विश्वास सार्थ करू, सभासदांना दिलेली आश्वासने टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येतील, अशी माहिती प्राथमिक शिक्षक बँकेचे नूतन अध्यक्ष विनायक शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, आम्ही निवडणुकीत आश्वासन दिले होते.

त्याप्रमाणे बँकेच्या कारभारात बदल पाहायला मिळेल. यावेळी अविनाश गुरव म्हणाले, गेल्या बारा वर्षात हुकूमशाही पद्धतीने एकमुखी कारभार सुरू होता. मात्र आता सर्व संचालकांच्या संमतीने आणि एकमताने कारभार होईल. सर्वांना विश्‍वासात घेतले जाईल. यावेळी अमोल शिंदे, अरूण पाटील, महादेव हेगडे, सुधाकर पाटील, माणिक पाटील, हंबिरराव पवार, राजकुमार पाटील, सूर्यकांत मंडले, शशिकांत माणगावे, नंदकुमार खराडे आदि उपस्थित होते.

बारा वर्षांच्या काळातील कारभाराची चौकशी
यापूर्वीच्या सत्ताधार्‍यांनी मनमानीपणाने केलेल्या कारभाराची चौकशी करून यामध्ये दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत सहकार विभागाकडे पाठपुरावा करण्यात येईल. चुकीच्या पद्धतीने पैसे गेले असतील तर त्याच्या वसुलीसाठी आम्ही पाठपुरावा करणार आहे. बँकेत पारदर्शी आणि स्वच्छ कारभार पाहण्यास मिळेल, असे अध्यक्ष शिंदे यांनी शेवटी स्पष्ट केले.

Back to top button