सांगली : राज्यात सत्तांतर…कोण अप कोण डाऊन | पुढारी

सांगली : राज्यात सत्तांतर...कोण अप कोण डाऊन

सांगली; सुनील कदम : सत्तांतरामुळे सर्वात मोठा धक्‍का बसला आहे तो राष्ट्रवादीला. भरधाव वेगात निघालेल्या गाडीला अचानक ब्रेक लागावा, तशी अवस्था राष्ट्रवादीचे नेते, कार्यकर्ते आणि पक्षाचीही झाली आहे. माजी मंत्री जयंत पाटील यांनी चमत्कारातून मिळालेल्या सत्तेचा पुरेपूर वापर करून शिराळा-वाळव्यासह संपूर्ण जिल्हाभर राष्ट्रवादीची मजबूत फळी उभारायला सुरुवात केली होती. भाजपच्या मतदार संघांमध्ये तर राष्ट्रवादीची पुनर्बांधणी सुरू होतीच, पण राज्याच्या सत्तेत मित्रपक्ष असलेल्या काँग्रेस आणि शिवसेनेच्या बाले किल्ल्यांनाही राष्ट्रवादीने भगदाड पाडायला सुरुवात केली होती. इस्लामपूर आणि खानापूर-आटपाडीत याचा वारंवार प्रत्यय येतच होता. किंबहुना राज्याच्या सत्तेत मित्रपक्ष असलेल्या काँग्रेस आणि शिवसेनेशी स्थानिक पातळीवर राष्ट्रवादीचे विळ्या-भोपळ्याचे सख्य होते. ही खदखद एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आ. अनिल बाबर आणि शिवसेना जिल्हा प्रमुख आनंदराव पवार यांनी जाहीरपणे बोलून दाखविली होती.

आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर जयंत पाटील यांनी अतिशय आक्रमकपणे राष्ट्रवादीची बांधणी करायला सुरुवात केली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी सगळ्या निवडणुका स्वबळावर लढवायच्या आणि या ठिकाणी राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आणायची, असे जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांचे-कार्यकर्त्यांचे प्रयत्न सुरू होते. सांगली महापालिकेतील सत्तांतर ही एक झलक होती. या प्रयत्नात राज्याच्या सत्तेतील मित्रपक्षांची स्थानिक पातळीवर त्यांनी फिकीरही केलेली दिसून येत नव्हती.

केवळ स्थानिक स्वराज्य संस्थाच नव्हे, तर आगामी विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातून राष्ट्रवादीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याच्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादीची पायाभरणी सुरू होती. शिराळ्याच्या वाकुर्डे बुद्रूक योजनेला भरघोस निधी, सांगली महा पालिकेसाठी 100 कोटी रुपयांचा निधी, जत तालुक्यात म्हैसाळ योजनेचा विस्तार, खानापूर-आटपाडी तालुक्या तील टेंभू योजनेला भरघोस निधीसह विस्तारित मान्यता, मिरज तालुक्याच्या पूर्वभागाला पाणी देण्यासाठी म्हैसाळ बंधारा यासह अनेक योजना आणि वेगवेगळ्या विकासकामांच्या माध्यमातून जयंत पाटील आणि त्याच्या टीमने जिल्हाभर एक ‘स्ट्राँग नेटवर्क’ उभारायला सुरुवात केली होती. जिल्ह्यात आता राष्ट्रवादीचा वारू रोखणे जवळजवळ अशक्य आहे, अशी हवा तयार होत होती. तेवढ्यात राज्यात सत्तांतर झाले आणि राष्ट्रवादीच्या या घोडदौडीला ब्रेक लागला. त्यामुळे सत्तांतराचा सर्वाधिक फटका

Back to top button