Sangli : आष्ट्यात दोन कुटुंबात हाणामारी | पुढारी

Sangli : आष्ट्यात दोन कुटुंबात हाणामारी

आष्टा; पुढारी वृत्तसेवा : किरकोळ कारणावरून येथील दोन कुटुंबामध्ये सोमवारी (दि.4)सायंकाळी जोरदार हाणामारी झाली. यामध्ये चारजण जखमी झाले. दोन्ही कुटुंबांनी आष्टा पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दिल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी दोन्हीकडील दहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

या हाणामारीत सुनील धोंडीराम कोळी, अमित सुनील कोळी तसेच वैभव कृष्णात यादव – पाटील, लालासो भीमराव यादव – पाटील हे चौघेजण जखमी झाले आहेत.

याप्रकरणी आष्टा पोलिसांनी सुनील कोळी यांच्या फिर्यादीवरून लालासाहेब भीमराव यादव – पाटील, ऋषिकेष प्रदीप यादव – पाटील, रोहित लालासाहेब यादव – पाटील, योगेश अर्जून यादव – पाटील, वृषभ किसन यादव – पाटील, किसन शंकरराव यादव – पाटील, स्वरुप जाधव (सर्व रा. आष्टा, दुधगाव रोड, शिवाजीनगर) यांच्याविरुद्ध तर वृषभ यादव – पाटील यांच्या फिर्यादीवरून सुनील धोंडीराम कोळी, अमित सुनील कोळी, वैभव सुनील कोळी (सर्व रा.आष्टा,दुधगांव रोड, शिवाजीनगर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

सुनील कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माझा मुलगा अमित व लालासाहेब भीमराव यादव – पाटील यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून वाद सुरू होता. संशयितांनी दगड, विटा, फरशी व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. वृषभ यादव पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, चुलते लालासाहेब यादव – पाटील व अमित कोळी यांच्यात वाद सुरू होता. तो सोडवण्यासाठी गेलो असता अमित सुनील कोळी, सुनील धोंडीराम कोळी, वैभव सुनील कोळी यांनी दोघांना दगड विटा आणि लाथाबुक्क्याने मारहाण करुन जखमी केले.

Back to top button