

इस्लामपूर; पुढारी वृत्तसेवा: अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी संशयित युवराज सखाराम पवार (वय 50, रा. किल्लेमच्छिंद्रगड, ता. वाळवा) याला पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्याला पाच दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. बलात्कारानंतर ती मुलगी पाच महिन्याची गरोदर राहिली होती.
फेब्रुवारी महिन्यात अल्पवयीन मुलगी घरी असताना युवराज याने तिच्यावर बलात्कार केला. नंतरही पीडितेला धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला. बलात्काराचा प्रकार कोणाला सांगितल्यास जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी युवराज याने मुलीला दिली होती. बलात्कारानंतर मुलगी गरोदर राहिली होती. पीडित मुलीने युवराज याच्याविरोधात इस्लामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी अटक करून युवराज याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला 4 जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.