शिक्षण : शोधा योग्य संधी, योग्य पर्याय! | पुढारी

शिक्षण : शोधा योग्य संधी, योग्य पर्याय!

शिक्षण ही ज्ञान, योग्य आचरण, तांत्रिक प्राविण्य, शिक्षण इत्यादी मिळवण्याची प्रक्रिया आहे. शिक्षणात ज्ञान, योग्य आचरण आणि तांत्रिक प्राविण्य, शिकवणे आणि शिकणे इत्यादींचा समावेश होतो. त्यामुळे हे कौशल्य, व्यापार किंवा व्यवसाय आणि मानसिक, नैतिक आणि सौंदर्याच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करते. आताच्या काळात शैक्षणिक क्षेत्रात नवनवीन संधी येत आहेत. याचा विद्यार्थी आणि पालकांनी देखील लाभ घेण्याची गरज आहे.
– विवेक दाभोळे

खरे तर आता सर्वच क्षेत्रात करिअरची संधी आहे, पण विद्यार्थ्यांनी करिअरसाठी आवडीचे क्षेत्र निवडणे गरजेचे आहे. शिक्षण हे महत्वाचे आहे. विद्यार्थी, पालक सर्वच जण शिक्षणाबाबत सजग असतात. परंतु अनेकवेळा योग्य माहिती न मिळाल्याने क्षमता व इच्छा असूनही आवडीच्या क्षेत्रात करिअर करायची संधी हुकते. बर्‍याचवेळा चुकीच्या शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेतला तर वेळ, पैसा आणि कालावधी वाया जाण्याची भीती असते. खरे तर मेडिकल, इंजिनिअरिंग व स्पर्धा परीक्षा म्हणजेच करिअर असे ठरावीक झापड लावून घेऊ नये. करिअर करण्यासाठी प्रत्येक क्षेत्रात चांगल्या संधी आहेत. करिअरच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण संस्था आणि शिक्षणाचा पर्याय मिळणे गरजेचे आहे. खरे तर आताचा काळ झपाट्याने बदलत आहे. पूर्वीच्या तुलनेत आधुनिक युगात केवळ मेडिकल आणि इंजिनिअरिंग याच्या मागे न धावता विविध प्रकारच्या संधी उपलब्ध होत आहेत. विद्यार्थ्यांनी आपल्यातील क्षमता ओळखून या संधीरुपी आव्हान स्वीकारून त्यावर स्वार होण्याची गरज आहे. आता अगदी प्रत्येकाला भरपूर संधी आहेत. मार्गदर्शन आणि माहिती मिळत आहे. हे ज्ञानाचे भांडार सहजासहजी उपलब्ध होत आहे. विविध चांगल्या शिक्षण देणार्‍या संस्था आपल्या परिसरात आहेत. आपल्यातील क्षमता, आवड ओळखून काय करायचे आहे ते ठरविण्याची आणि एकदा निर्णय घेतला की त्याच्याशी ठाम राहण्याची खरी गरज आहे. केवळ आपला मित्र जातो, शेजारी जातो, आई- वडील सांगतात म्हणून कोणतेही क्षेत्र न निवडता आपल्या आवडीचे, आपल्यातील आवड, क्षमता ओळखून निवड करण्याची गरज आहे. बदलत्या काळात आता मेडिकल आणि इंजिनिअरिंग शिवाय अ‍ॅनिमेशन, फॅशन, डिझाइनिंग, एरॉनॉटीकल, इन्फॉर्मेशन, परदेशी भाषा, नृत्य, संगीत आदींमध्ये शिक्षण, संधी उपलब्ध आहे. चांगल्या पद्धतीने ध्येय निवडावे. ध्येय निवडल्यानंतर त्यावर चांगल्या पद्धतीने काम केले पाहिजे. एखादे अपयश आले तर ध्येय बदलता कामा नये. उलट सकारात्मक विचार ठेवून अधिक प्रयत्न केले तर निश्चितपणे ध्येय गाठता येते.

आजकाल, शिक्षण व्यवस्थेला चालना देण्यासाठी अनेक सरकारी योजना चालवल्या जात आहेत. यातून सार्‍यांनाच योग्य शिक्षणाची उपलब्धता शक्य होईल. पूर्वी शिक्षण व्यवस्था खूप महाग आणि कठीण होती. अगदी सामान्यांना बारावीनंतर उच्च शिक्षण घेता येत नव्हते. मात्र, आता संपूर्ण प्रक्रिया आणि शिक्षणाच्या विषयात मोठे बदल करण्यात आले आहेत.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, दूरशिक्षण प्रणालीने उच्च शिक्षण परवडणारे आणि सुलभ केले आहे, जेणेकरून मागास भागातील, गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांना समान शिक्षण आणि भविष्यात यश मिळवण्याच्या समान संधी मिळतील. शिक्षणाचे हे साधन वापरून आपण आयुष्यात काहीही चांगले साध्य करू शकतो. उच्च दर्जाचे शिक्षण लोकांना सामाजिक आणि कौटुंबिक आदर आणि वेगळी ओळख निर्माण करण्यास मदत करते. शिक्षणाचा काळ हा प्रत्येकासाठी सामाजिक आणि वैयक्तिकरीत्या अत्यंत महत्त्वाचा काळ आहे. शिक्षण हे व्यक्तीला वेगळ्या पातळीवर आणि जीवनात चांगुलपणाची भावना विकसित करते. शिक्षण कोणत्याही मोठ्या कौटुंबिक, सामाजिक आणि अगदी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय समस्यांचे निराकरण करण्याची क्षमता प्रदान करते. आपल्यापैकी कोणीही जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये शिक्षणाचे महत्त्व दुर्लक्षित करू शकत नाही. हे मनाला सकारात्मक दिशेने वळवते आणि सर्व मानसिक आणि नकारात्मक विचार काढून टाकते. शिक्षण लोकांच्या मनाला मोठ्या प्रमाणात विकसित करण्याचे काम करते. त्याचबरोबर समाजातील लोकांमधील सर्व भेदभाव दूर करण्यास मदत करते. हे आम्हाला चांगले अभ्यास शिकण्यास मदत करते आणि जीवनातील प्रत्येक पैलू समजून घेण्यासाठी समज विकसित करते. यासाठी योग्यवेळी, योग्य शिक्षणाचा पर्याय अवलंबणे गरजेचे आणि जीवनात यशस्वी होण्यासाठी अत्यंत मदतकारक ठरते.!

Back to top button