सांगलीत टेम्पोचे टायर पळविले | पुढारी

सांगलीत टेम्पोचे टायर पळविले

सांगली; पुढारी वृत्तसेवा : येथील सरस्वतीनगरमधील किशन चंदमशेखर बजाज यांचे टेम्पोचे पाठीमागील चाक चोरट्यांनी पळविले. बजाज यांनी रस्त्याकडेला टेम्पो पार्किंग केला होता. मध्यरात्री चोरट्यांनी चाक पळवून नेले. दुसर्‍यादिवशी सकाळी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. बजाज यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button