Sangli donkey theft
सांगलीतून 23 गाढवे चोरीला, आंध्रप्रदेशमध्ये तस्करी

Sangli donkey theft| सांगलीतून 23 गाढवे चोरीला, आंध्रप्रदेशमध्ये तस्करी

पोलिसांचे पथक मागावर ः तस्कारांची टोळी सक्रिय
Published on

सांगली ः शहरातील भाजी मंडई परिसरातून मंगळवारी रात्री 23 गाढवे चोरून नेण्यात आली. आंध्रप्रदेशमधील टोळीने ही गाढवे चोरल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. शहर पोलिसांचे एक पथक चोरट्यांच्या मागावर आहे. गाढवाची चोरी करणारी टोळी पुन्हा सक्रिय झाल्याने गाढवांच्या मालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

हरिपूर येथील अरविंद पोपट माने (वय 34, रा गोठण भाग) यांच्या मालकीची 3 लाख 45 हजार रुपये किंमतीची 23 गाढवे होती. ही गाढवे दि. 22 रोजी रात्री शिवाजी मंडई परिसरात फिरत होती. माने यांनी मंडई परिसरात शोध घेतला, पण ती मिळून आली नाहीत. पोलिसांनी मंडई परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. यात काहीजण कंटनेरमध्ये गाढवे घालत असल्याचे दिसून आले. ही टोळी आंध्र प्रदेशमधील असल्याचे समोर आले आहे. पोलिसांचे एक पथक टोळीच्या शोधासाठी रवाना झाले आहे.

चीनमध्येही तस्करी

गाढवांची चोरी करून लाखो रुपयांना विक्री करणारी परराज्यातील टोळी सक्रिय झाली आहे. प्रामुख्याने आंध्र प्रदेश व हैदराबाद हे तस्करीचे मुख्य केंद्र आहे. मध्यंतरी सांगली-मिरजेसह जिल्ह्यातून गाढवांची चोरी करून त्याची चीनमध्ये तस्करी करण्यात आल्याची धक्कादायक बाब पोलिस तपासात समोर आली होती. औषध निर्मिती तसेच उत्तेजना वाढविणारी औषधे बनविण्यासाठी गाढवांचा वापर केला जात असल्याचे सांगण्यात येते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news