पंढरपूर; पुढारी वृत्तसेवा : श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तींची झीज होत असल्याचे पाहणीतून समोर आल्याने मंदिर समितीने मूर्तीची पाहणी करण्यासाठी भारतीय पुरातत्व विभागाला पाचारण केले होते. पुरातत्व विभागाच्या अहवालानुसार श्री विठ्ठलाची मूर्ती सुरक्षित आहे. तर रुक्मिणी मातेच्या चरणाची झिज झाली असून मूर्ती सुरक्षित आहे. त्यामुळे केवळ रुक्मिणी मातेच्या चरणाची झीज झाल्याने त्यावर दि. 11 जून रोजी सायंकाळी वज्रलेप करण्यात येणार असल्याची माहिती व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनीं दिली.