

सांगली; पुढारी वृत्तसेवा : तुंग (ता. मिरज) येथील राहुल राजेंद्र पाटील यांची गाय चोरट्यांनी पळविली. तिची किंमत 40 हजार रुपये आहे. पाटील यांनी त्यांची जर्शी गाय गोठ्यात बांधली होती. मध्यरात्री चोरट्यांनी गोठ्यातून ही गाय पळविली. दुसर्यादिवशी हा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे त्यांनी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दाखल केली.