तासगाव : लिंब येथे तिघांना मारहाण; पाच जणांविरोधात गुन्हा

File photo
File photo

तासगाव; पुढारी वृत्तसेवा : लिंब (ता. तासगाव) येथे तिघांना मारहाण केल्याचा कारणावरून पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सुभाष तुकाराम पाटील (वय 65) यांनी याप्रकरणी तासगाव पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

सागर सुशीलकुमार गुरव, राहुल तानाजी गुरव, सुशांत तानाजी गुरव, वंदना तानाजी गुरव व रुपाली तानाजी गुरव (सर्व रा. लिंब) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी, फिर्यादी सुभाष आणि संशयितांची शेतजमीन आहे. संशयितांच्या शेतात जाण्याची वाट फिर्यादी सुभाष यांच्या शेतातून जाते.सुभाष यांनी "आमच्या शेतातून का जाता" असे म्हटल्याच्या कारणावरून चिडून संशयितांनी सुभाष व त्यांचा मुलगा आणि पत्नी यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्याांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news