सांगली : सहा दिवसांपूर्वीच लग्न झालेल्या प्रेयसीसह प्रियकराची आत्महत्या

सांगली : सहा दिवसांपूर्वीच लग्न झालेल्या प्रेयसीसह प्रियकराची आत्महत्या

जत: पुढारी वृत्तसेवा : एकुंडी (ता. जत) येथे प्रेमी युगुलाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अश्विनी गजानन माळी (वय २२, मूळ रा. सलगरे, ता. मिरज, सध्या रा. एकुंडी, ता. जत) व लक्ष्मण संभाजी शिंदे (वय २१, रा. एकुंडी, ता. जत ) अशी मयत प्रेमी युगलाची नावे आहेत. दोघांनीही एकुंडी येथील आपआपल्या घरी विष पिऊन आत्महत्या केली. मयत अश्विनी हिचा विवाह एक जूनला झाला होता.

याबाबतची अधिक माहिती अशी, अश्विनी माळी ही मूळची सलगरे येथील असून सध्या ती एकुंडी येथे राहण्यास आहे. एकुंडी येथीलच लक्ष्मण शिंदे याच्याबरोबर अश्विनी हिचे प्रेम संबंध होते. अश्विनी हिचे एक जूनला लग्न झाले होते. मिरज येथून अश्विनी ही एकुंडी येथे दोन दिवसांपूर्वी आली होती. सोमवारी दुपारी अश्विनी व लक्ष्मण यांनी विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. अश्विनी व लक्ष्मणला अस्वस्थ होत असल्याने तातडीने जत ग्रामीण रुग्णालयात आणले. तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या दोन्ही घटनेची नोंद जत पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

अश्विनी ही सहा दिवसांपूर्वी माहेरी आली होती. माहेरी आल्यानंतर लक्ष्मणबरोबर तिने फोनवर चर्चा करून जीवन संपवण्याचा निर्णय घेतला असावा, अशी चर्चा सुरू होती. त्यानंतर दोघांनीही विष प्राशन करून आत्महत्या केली.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news