सांगली : शिक्षक बँकेसाठी 126 अर्ज दाखल | पुढारी

सांगली : शिक्षक बँकेसाठी 126 अर्ज दाखल

सांगली; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीसाठी आजपर्यंत एकूण 108 इच्छुकांनी 126 अर्ज दाखल केले आहेत. विद्यमान अध्यक्ष उत्तम जाधव यांच्यासह काही संचालक आणि शिक्षक संघटनांच्या नेत्यांनी अर्ज दाखल केले. आज गुरुवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे.

प्राथमिक शिक्षक बँकेची निवडणूक 3 जुलैरोजी होणार आहे. त्यासाठी आज गुरुवारपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. विद्यमान अध्यक्ष उत्तम जाधव यांच्यासह अविनाश गुरव, महादेव हेगडे, शामगोंड पाटील या विद्यमान संचालकांनी अर्ज दाखल केले. तर विकास शिंदे, अमोल माने, महेश शरनाथे, दयानंद मोरे, बाबासाहेब लाड या प्रमुख नेत्यांनीही अर्ज दाखल केले आहेत.

दाखल झालेल्या अर्जामध्ये वाळवा विभागातून 9 उमेदवारांनी 11 अर्ज दाखल केले आहेत. तर मिरज विभागातून 13 (15), तासगाव विभागातून 7 (10), पलूस विभागातून 5 (6), खानापूर विभागातून 11 (14), कडेगाव विभागातून 4 (4), कवठेमहांकाळ विभागातून 3 (3), जत विभागातून 12 (13), शिराळा विभागातून 7 (11), आटपाडी विभागातून 5 (5) असे अर्ज दाखल झाले आहेत.

महिला विभागातून 10 (11), इतर मागास वर्ग विभागातून 7 (7), अनुसुचित जाती, जमाती विभागातून 7 (8) आणि भटक्या विमुक्त जाती व जमाती, वि. मा. प्र. विभागातून 8 (8) अर्ज दाखल झाले आहेत.

Back to top button