मिरजेत फ्लॅट फोडून ऐवज लंपास | पुढारी

मिरजेत फ्लॅट फोडून ऐवज लंपास

मिरज; पुढारी वृत्तसेवा : शहरातील वसंत कॉलनीत बंद फ्लॅट फोडून चोरट्याने सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा 62 हजार रुपये किंमतीचा ऐवज लंपास केला. याबाबत सुलभा सदाशिव वाले यांनी महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सुलभा वाले या वसंत कॉलनी येथील संजय अपार्टमेंटमध्ये राहण्यास आहेत. मंगळवारी सकाळी त्या फ्लॅट बंद करून बाहेर गेल्या होत्या. त्यांच्या फ्लॅटवर पाळत ठेवून असलेल्या चोरट्याने फ्लॅटचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 42 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने आणि 20 हजार रुपये रोख रक्कम असा 62 हजार रुपये किंमतीचा ऐवज घेऊन चोरट्याने पलायन केले. सुलभा वाले या सायंकाळी घरी परतल्यानंतर त्यांना फ्लॅटचा दरवाजा उघडा दिसला. याबाबत त्यांनी फिर्याद दिली असून अज्ञाता चोरट्याविरुद्ध महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Back to top button