

सांगली; पुढारी वृत्तसेवा : किर्लोस्करवाडी (ता. पलूस) येथील सावंतपूर वसाहतीमध्ये राहणारे प्रवीण शंकर हजारे यांचा ट्रक चोरट्यांनी पळविला. हजारे यांनी वखारभागातील वाहन पार्किंग अडड्यावर त्यांचा ट्रक (एमडब्ल्यूई-5397) लावला होता. मध्यरात्री चोरट्यांनी तो पळविला. हजारे यांनी परिसरात ट्रकचा शोध घेतला, पण सापडला नाही. त्यामुळेे त्यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.