कोरोनातील अनाथ बालकांच्या शिक्षणास मदत | पुढारी

कोरोनातील अनाथ बालकांच्या शिक्षणास मदत

सांगली; पुढारी वृत्तसेवा : कोरोनात आई-वडील गमावलेल्या सर्व बालकांचा शैक्षणिक खर्च शासन करणार आहे. त्यांच्या उच्चशिक्षणासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाईल. तसेच महिन्याला 4 हजार रुपये मदत दिली जाईल, असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले.

जिल्हा नियोजन समिती सभागृहात कोविडमुळे अनाथ झालेल्या बालकांचे जीवन संरक्षित करण्याबाबत व्हर्चुअल मोडद्वारे प्रधानमंत्री मोदी यांनी संबोधित केले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, जिल्हा महिला बाल कल्याण अधिकारी सुवर्णा पवार, बाल कल्याण समिती सदस्य तसेच अनाथ बालके व त्यांचे नातेवाईक उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांच्या हस्ते 28 बालकांना विविध योजनांचे प्रमाणपत्र व कीट देण्यात आले. पी.एम.केअर फॉर चिल्ड्रन योजनेतून 18 ते 23 वयोगटातील अनाथ बालकांना स्टायफंड दिला जाईल. 23 वर्षानतंर विम्याच्या स्वरूपात 10 लाख रुपये दिले जातील. या बालकांना हेल्थ कार्ड व 5 लाखांपर्यंत आरोग्य बाबत उपचार सुविधा दिल्या जातील. या बालकांना कोणत्याही अडचणी निर्माण झाल्यास त्यांनी थेट जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी कोरोना काळात पालक गमावलेल्या बालकांसाठी राबविण्यात येत असलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर केला.

Back to top button