चांदोली धरणात 12.71 टीएमसी पाणीसाठा | पुढारी

चांदोली धरणात 12.71 टीएमसी पाणीसाठा

वारणावती; पुढारी वृत्तसेवा : चांदोली धरणात आजअखेर 12.71 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. यात 7 टी.एम.सी. पाणी मृतसंचय तर उपयुक्त पाणीसाठा 5.82 टी.एम.सी. आहे. धरणातील पाणी पातळी 600 मीटर असून पाण्याची टक्केवारी 36.93 टक्के आहे. एकूण 34 .40 टी.एम.सी. क्षमता असणारे हे धरण गेल्या पावसाळ्यात शंभर टक्के भरले होते.

हिवाळ्यात दर 15 दिवसांनी तर उन्हाळ्यात दर 21 दिवसांनी वारणा कालव्यातून शेतीसाठी धरणातून पाणी सोडले जाते. सध्या वीज निर्मिती व कालवेमार्फत 1390 क्युसेक दराने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

धरणात सध्या 12.71 टीएमसी पाणीसाठा आहे. दरम्यान, पाण्याच्या साठ्याचा अंदाज घेऊनच यंदाही धरण प्रशासनाने पाण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे जूनअखेर हे पाणी पुरेल असे सध्यातरी चित्र आहे.

Back to top button