सांगली : जिल्ह्यातील तलावांत 24% पाणीसाठा | पुढारी

सांगली : जिल्ह्यातील तलावांत 24% पाणीसाठा

सांगली ; पुढारी वृत्तसेवा : टेंभू, ताकारी, म्हैसाळ, आरफळ या उपसा सिंचन योजनांमुळे जिल्ह्यात अनेक तलावांमध्ये सध्या पुरेसा जलसाठा उपलब्ध आहे. जिल्ह्यातील पाच मध्यम प्रकल्पांत 566 दशलक्ष घनफूट म्हणजे 33 टक्के पाणी उपलब्ध आहे. 78 लघू प्रकल्पात हजार 846 दशलक्ष घनफूट म्हणजे 31 टक्के पाणी आहे. जिल्ह्यात सध्या 2 हजार 412 दशलक्ष घनफूट म्हणजे 24 टक्के पाणीसाठा आहे. जत तालुक्यातील 6 तर तासगाव तालुक्यातील 1 तलाव कोरडा पडला आहे.

वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. जिल्ह्यात मध्यम प्रकारचे पाच तलाव असून पाणी साठवण क्षमता 1 हजार 760 दशलक्ष घनफूट आहे. लघू प्रकल्प 78 आहेत. या प्रकल्पाची पाणीसाठवण क्षमता 6 हजार 50 दशलक्ष घनफूट आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी या प्रकल्पामधून जास्त पाणीसाठा उपलब्ध आहे. जत तालुक्यात सर्वाधिक 27 प्रकल्प असून, 22 टक्के पाणीसाठा आहे. तासगाव तालुक्यात सात प्रकल्प असून 42 टक्के पाणीसाठा आहे. खानापूर तालुक्यात आठ प्रकल्पापासून 33 टक्के पाणीसाठा आहे. कडेगाव तालुक्यात सात प्रकल्पापासून 25 टक्के पाणीसाठा आहे. शिराळा तालुक्यात पाच प्रकल्पांपासून 33 टक्के पाणीसाठा आहे. आटपाडी तालुक्यात 13 प्रकल्पांपासून 55 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. कवठेमहांकाळ तालुक्यात 11 प्रकल्पांपासून 28 टक्के पाणीसाठा आहे. मिरज तालुक्यात तीन प्रकल्पांपासून 33 टक्के पाणीसाठा आहे. वाळवा तालुक्यात दोन प्रकल्पात 13 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. पलूस तालुक्यात तलाव नाहीत.

वाळवा आणि पलूस तालुक्यात कृष्णा आणि वारणा नद्यांचे पाणी आहे. त्यामुळे या भागात पाणी टंचाई जाणवत नाही. जिल्ह्यात झालेल्या उपसासिंचन योजनामुळे पूर्व भागात पाणी पातळी यंदा फारशी खाली गेली नाही.

आटपाडी तालुक्यात सर्वाधिक पाणीसाठा

एकेकाळी आटपाडी तालुका हा कायम दुष्काळी म्हणून ओळखला जात होता. बागायती क्षेत्र फारसे नव्हते. या तालुक्यात 13 प्रकल्प आहेत. मात्र, ते उन्हाळ्यात कोरडे पडत होते. त्यामुळे लोकांना हा भाग सोडून बाहेर जावे लागत होते. आता टेंभू योजनेचे पाणी गेल्यामुळे अनेक गावांतील पाणी प्रश्न निकालात निघाला आहे. सध्या तालुक्यात सर्वाधिक पाणीसाठा आहे.

आटपाडी तालुक्यात सर्वाधिक पाणीसाठा

एकेकाळी आटपाडी तालुका हा कायम दुष्काळी म्हणून ओळखला जात होता. बागायती क्षेत्र फारसे नव्हते. या तालुक्यात 13 प्रकल्प आहेत. मात्र, ते उन्हाळ्यात कोरडे पडत होते. त्यामुळे लोकांना हा भाग सोडून बाहेर जावे लागत होते. आता टेंभू योजनेचे पाणी गेल्यामुळे अनेक गावांतील पाणी प्रश्न निकालात निघाला आहे. सध्या तालुक्यात सर्वाधिक पाणीसाठा आहे.

जिल्ह्यातील सर्व पाणीउपसा योजना सुरू आहेत. तलावातूनसुद्धा पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे यंदा पाणी टंचाई फारशी जाणवणार नाही. तरीसुद्धा शेतकर्‍यांनी पाण्याचे नियोजन अचूक आणि योग्य पद्धतीने करावे. पाणीपट्टीची रक्कम वेळेवर भरावी.
-मिलिंद नाईक, अधीक्षक अभियंता, पाटबंधारे विभाग, सांगली.

Back to top button