तासगाव रिंगरोडसाठी 173 कोटी रुपये मंजूर; नितीन गडकरी यांची घोषणा

सांगली येथील विटामधील कार्यक्रमामध्ये घोषणा
Tasgaon Ringroad
तासगाव रिंगरोडसाठी 173 कोटी रुपये मंजूरPudhari Photo
Published on
Updated on

तासगाव शहर : मागील अनेक वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या तासगाव रिंगरोडसाठी अखेर शुक्रवारी (दि.4) मंजुरी मिळाली आहे. सात किलोमीटरच्या रिंगरोडसाठी 173 कोटी रूपये मंजूर झाले असल्याची माहिती केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. या रिंगरोडसाठी आमदार सुमनताई आर. आर. पाटील व रोहित पाटील यांनी प्रयत्न केले होते.

Tasgaon Ringroad
Ring Road : पूर्व हवेलीत रिंग रोडच्या आखणीत आणखी एकदा बदल

शहरात मागील दोन वर्षात मोठ्या प्रमाणावर वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला होता. शहरातील वाहतुकीची समस्या मार्गी लागावी, यासाठी आमदार सुमनताई आर. आर. पाटील तसेच रोहित पाटील यांनी वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांना वेळोवेळी भेटून रिंगरोड मंजूर व्हावा अशी मागणी केली होती. रोहित पाटील स्वत: दिल्ली येथे नितीन गडकरी यांची अनेक वेळा भेट घेतली होती. दरम्यान नितीन गडकरी यांनी या रोड बाबत लवकरच निधी मंजूर करू, अशी ग्वाही दिली. अखेर शुक्रवारी (दि.4) विटा येथे कार्यक्रमानिमित्त वाहतूक मंत्री नितीन गडकरी आले होते. यावेळी त्यांनी या सात किलोमीटरच्या रिंगरोडसाठी 173 कोटी रूपये मंजुरी दिली असल्याचे सांगत आवर्जून तासगाव कवठेमहांकाळचे आमदारांनी भेटून या रिंगरोडची मागणी केल्याचेही आपल्या भाषणात सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news