जिल्ह्यातील 17 परमीट बार आठवड्यासाठी बंद

राज्य उत्पादन शुल्कची कारवाई, विना वाहतूक मद्यसाठा केल्याचे उघड
Sangli News
जिल्ह्यातील 17 बार आठवड्यासाठी बंदFile Photo

सांगली, पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यातील परमीट रूम व बारची तपासणी केली होती. यात जिल्ह्यातील 17 बारमध्ये विना वाहतूक मद्यसाठा आढळून आला होता. या परमीट रूम व बार आठवडाभरासाठी बंद ठेवण्याची कारवाई उत्पादन शुल्क विभागाने केली. या कारवाईमुळे परमीट रूम, बारचालकात खळबळ उडाली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या काळात राज्य उत्पादन शुल्क विभागाने परमीट रूम, बारवर विशेष लक्ष केंद्रित केले होते. या काळात तपासणीत अनेक बारचालकांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे दिसून आले. त्यानंतर सहा बारचालकांवर कारवाई करण्यात आली होती. परमीट बारच्या तपासणीत 17 ठिकाणी विना वाहतूक मद्यसाठा आढळून आला होता.

Sangli News
Pune News| शहर, जिल्ह्यातील २११ हॉटेल, बार रडारवर

या बारचालकांनी वाईन शॉपमधून मद्यसाठा खरेदी केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर संबंधित बारचालकांवर कारवाईचा प्रस्ताव जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्याकडे पाठविण्यात आला होता. त्याला जिल्हाधिकार्यांनी मंजुरी दिली. त्यानुसार आता जिल्ह्यातील 17 बार आठवड्यासाठी बंद राहणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्कचे प्रदीप मोटे यांनी सांगितले. या कारवाईमुळे परमीट बारचालकांत खळबळ उडाली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news