पेन्शनच्या आमिषाने वृध्देची 17 एकर जमीन लाटली

Pension fraud: जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांच्याकडे तक्रार
Land fraud elderly woman
दहापट नफ्याच्या आमिषाने 37 लाख गमावलेFile Photo
Published on
Updated on

सांगली ः विधवा महिला लाभार्थी पेन्शन सुरू करून देतो, असे सांगत खरेदी पत्रावर अंगठ्याचे ठसे घेत फसवणूक करून वृध्द विधवेची सुमारे 17 एकर जमीन हडपल्याचा आरोप आटपाडी तालुक्यातील पडळकरवाडी येथील पडळकर कुटुंबीयांनी केला आहे. खरेदी दस्त तत्काळ रद्द न केल्यास आत्मदहन करण्याचा इशाराही दिला. जमिनीचा दस्त ज्यांच्या नावे केलेला आहे तो एका आमदारांच्या फॉर्महाऊसचा मॅनेजर आहे. राजकीय दबावामुळे दोषीवर कारवाई होत नाही, असाही आरोप त्यांनी केला. दरम्यान, याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली असून दखल न घेतल्यास आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.

पडळकर कुटुंबीयांनी सांगितले की, वृध्द महिला श्रीमती विठाबाई बापू पडळकर यांच्या नावे आणि त्यांच्या कुटुंबांची आणेवारीतील आटपाडी तालुक्यातील पडळकरवाडी येथे सुमारे 17 एकर जमीन होती. विठाबाई यांना विधवेची पेन्शन मिळवून देतो, असे सांगून गावचे पोलिस पाटील अमोल उत्तम पडळकर यांनी आटपाडी येथील नोंदणी कार्यालयात नेले, तेथे एका आमदाराच्या फॉर्महाऊसचे मॅनेजर असलेल्या कैलास मोतीराम वाघमारे यांच्या नावे खरेदीदस्त केला.

या व्यवहाराची माहिती मिळाल्यानंतर विठाबाईचे नातू राजेंद्र व किरण पडळकर यांच्यासह नातेवाईकांना समजल्यानंतर त्यांनी आटपाडी पोलिसांत तक्रार दिली. मात्र राजकीय दबावामुळे कोणतीही दखल घेतली गेली नाही, उलट धमकी ही दिली जात आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली, मात्र अद्याप त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे आम्ही तक्रारीची दखल न घेतल्यास आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.

आरोपात तथ्य नाही ः वाघमारे

याबाबत कैलास वाघमारे म्हणाले, रीतसर पैसे देऊन खरेदी करून ही जमीन घेतलेली आहे या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news