सांगली : भरदिवसा लग्न कार्यालयातील 19 तोळे दागिने लंपास

सांगली : भरदिवसा लग्न कार्यालयातील 19 तोळे दागिने लंपास

सांगली; पुढारी वृत्तसेवा : इनाम धामणी (ता. मिरज) येथील ऐश्वर्या गार्डन मल्टिपर्पज हॉलमध्ये लग्नकार्याच्या वेळी 19 तोळे सोन्याचे दागिने आणि रोख 15 हजार रुपये असा मुद्देमाल लंपास करण्यात आला.

याबाबत तृप्ती प्रमोद तेरदाळे (रा. पुणे) यांनी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितले, शुक्रवारी इनाम धामणी येथील ऐश्वर्या मल्टिपर्पज हॉल येथे तेरदाळे यांच्या नातेवाईकांचे लग्नकार्य होते. त्यानिमित्ताने त्या कार्यालयात उपस्थित होत्या. त्यावेळी त्यांच्या आईने त्यांच्याकडे ठेवण्यासाठी पर्स दिली होती. तेरदाळे या बहिणीच्या मुलीला कपडे घालत असताना पर्स लंपास करण्यात आली. त्यामध्ये दोन लाख दहा हजार रुपये किमतीचा सोन्याचा बाजूबंद, दीड लाख रुपयांचा कोल्हापुरी साज, चार तोळ्याचा नेकलेस हार, रोख 15 हजार रुपये असा मुद्देमाल होता.

पर्स गायब झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी शोध घेतला, मात्र मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मंगल कार्यालयात चोरीचे वाढते प्रकार

गेल्या काही दिवसांपासून मंगल कार्यालयात चोरीचे प्रकार वाढत आहेत. कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे असतात. तरीसुद्धा दागिने, मोबाईल लंपास केले जात आहेत. यातील अनेक गुन्ह्यांचा छडा अद्याप लागलेला नाही.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news