सांगली-कोल्हापूर दरम्यान 15 पासून नियमीत डेमू | पुढारी

सांगली-कोल्हापूर दरम्यान 15 पासून नियमीत डेमू

मिरज पुढारी वृत्तसेवा:  कोरोनानंतर तब्बल दोन वर्षानंतर मध्य रेल्वेने डेमू गाड्या सुरू करण्यास परवानगी दिली. त्यामुळे सांगली ते कोल्हापूर दरम्यान धावणार्‍या सर्व डेमू गाड्या दि. 15 पासून सुरू होत आहे. यामध्ये मिरज-कोल्हापूर, कोल्हापूर-मिरज, सांगली-कोल्हापूर आणि कोल्हापूर-सांगली डेमूचा समावेश आहे.

कोल्हापूर-मिरज डेमू कोल्हापुरातून सकाळी 10.30 वाजता सुटेल, मिरजेत 11.45 वाजता पोहोचेल, मिरज-कोल्हापूर डेमू मिरजेतून दुपारी 2.50 वाजता सुटेल ती कोल्हापूर येथे 3.30 वाजता पाहोचेल, मिरजेतून सायंकाळी 5 वाजता सुटून सायंकाळी 6.10 वाजता कोल्हापुरात पोहोचेल, कोल्हापुरातून 9.30 वाजता सुटून मिरजेत 10.45 वाजता पोहोचेल. तर कोल्हापूर-सांगली डेमू कोल्हापुरातून सायंकाळी 6.40 वाजता सुटेल. ती सांगलीत 8.20 वाजता पोहोचेल. सांगलीतून 8.35 वाजता सुटून कोल्हापुरात 10.20 वाजता पोहोचेल.

Back to top button