सांगली: गॅस सिलिंडर केले कृष्णा नदीला अर्पण | पुढारी

सांगली: गॅस सिलिंडर केले कृष्णा नदीला अर्पण

सांगली; पुढारी वृत्तसेवा: दरवाढीमुळे मदनभाऊ पाटील युवा मंचने घरगुती गॅस सिलिंडर कृष्णा नदीला अर्पण करत अनोखे आंदोलन केले. महागाईविरोधात केंद्र शासनाचा धिक्कार केला. निषेधाच्या घोषणाही दिल्या.

मदनभाऊ युवा मंचचे अध्यक्ष आनंद लेंगरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. युवा मंचचे शीतल लोंढे, नगरसेवक प्रकाश मुळके, प्रमोद सूर्यवंशी, प्रवीण निकम, शेखर पाटील, मयूर बांगर, अवधूत गवळी व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लेंगरे म्हणाले, उत्तरप्रदेशसह चार राज्यांच्या निवडणुका झाल्यानंतर दररोज पेट्रोल, डिझेल व दैनंदिन वस्तुंच्या महागाईचा सपाटा चालू आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसत आहे.

मोदी सरकार भांडवलदारांचे व उद्योगपतींचे सरकार आहे. सर्वसामान्य जनतेचे त्यांना काही देणे-घेणे नाही. मोदी सरकारचे बोलणे आणि वागणे यात जमीन-अस्मानाचे अंतर आहे. लबाड मोदी सरकारला जनतेने धडा शिकवावा.

घरगुती गॅस सिलिंडर तसेच जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ केंद्र शासनाने मागे घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल.

Back to top button