सांगली : गौण खनिज तस्करी, मटका सुरूच | पुढारी

सांगली : गौण खनिज तस्करी, मटका सुरूच

कडेगाव : रजाअली पीरजादे : सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी मोठ्या प्रमाणात क्राईम रेट घटला आहे. तालुक्यातील कडेगाव आणि चिंचणी वांगी या दोन्ही पोलिस ठाणेअंतर्गत मार्च 2020 ते मार्च 2021 या गतवर्षी 136 गुन्हे दाखल झाले होते.

चालूवर्षी मार्च 2021 ते फेब्रुवारी 2022 अखेर 110 गुन्हे दाखल झाले आहेत. यावर्षी सर्वच गुन्ह्यांचा आलेख उतरला आहे. हा क्राईम रेट घटण्यामागे कोरोना तसेच समाजव्यवस्थेने दाखवलेला समजूतदारपणा आणि पोलिसांकडून होणारे कौन्सिलिंग कारणीभूत असावे.

सांगली जिल्ह्यातील कडेगाव हे पोलिस ठाणे ब्रिटिश काळापासूनचे आहे. पूर्वी कडेगाव येथे पोलिस ठाणे आणि देवराष्ट्रे येथे पोलिस आऊट पोस्ट होते. आता कडेगाव येथे तालुका पोलिस ठाणे झाले आहे. शाळगाव व नेवरी येथे आऊट पोस्ट सुरू करण्यात आले आहे. कडेगाव ठाण्यामध्ये एक निरीक्षक, एक सहायक निरीक्षक, दोन सहायक उपनिरीक्षक असे मिळून 40 कर्मचारी आहेत.

एकूण गुन्ह्यांची तुलना

मार्च 2020 ते मार्च 2021 गुन्ह्यांची संख्या – खून : 4 , खुनाचा प्रयत्न : 3, गर्दी मारामारी : 21, दुखापत : 56, बलात्कार : 3, जबरी चोरी : 2, घरफोड्या : 8 , चोरी : 39

जनतेच्या सहकार्यामुळे यावर्षी क्राईम रेट बर्‍यापैकी उतरला आहे. गुन्ह्याची माहिती मिळाली किंवा गुन्हा नोंद झाला की त्यावर कार्यवाही करण्याचा आमच्याकडून प्रामाणिक प्रयत्न केला जातो. वेळेत तक्रार दाखल करून घेऊन वाद मिटवले जात आहेत. तालुका राजकीयदृष्ट्या संवेदनशील आहे. तरी राजकीय नेतृत्वाची समन्वयाची भूमिकाही महत्त्वाची ठरली आहे.
– पांडुरंग भोपळे,
पोलिस निरीक्षक, कडेगाव

Back to top button